• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा ६ वा वर्धापन दिन २१ जून रोजी गेवराईत साजरा होत आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन जगातील २६० देशांमध्ये २१ जून रोजी साजरा होतो. पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट यांच्या वतीने व्यापारी असोसिएशन, जय गुरुदेव ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई येथील ताकडगाव रोडवरील डॉ. मुरलीधर शेषराव मोटे यांच्या शिवनेरी लॉन्स सभागृहात सोमवार दि. २१ रोजी सकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत तज्ज्ञ योग शिक्षकांच्या उपस्थितीत सातवा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जाणार आहे.कोरोना -19 च्या सर्व नियमांचे पालन करून योगा दिन साजरा केला जात आहे. स्त्री -पुरुष, युवक -युवती योगसाधकांनी सैल पांढरेशुभ्र कपडे परिधान करून अंथरण्यासाठी आपापली आसनपट्टी सोबत आणावी. गेवराई शहरातील व परिसरातील नागरिकांनी योगदिनास उपस्थित रहावे, असे आवाहन भारत स्वाभिमान ट्रस्टचे तालुका प्रभारी डॉ. मुरलीधर मोटे, पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी प्रा. राजेंद्र बरकसे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रताप खरात, बाळासाहेब बरगे, सुरेंद्र रुकर यांच्यासह योग शिक्षक , योगसाधकांनी केले आहे.