• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

धारूर तालुका प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पोषण ट्रॅकर अँप व कोरोना संबंधित मागण्या मान्य करा या मागणीसाठी दि 3 जून गुरुवार रोजी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनकडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समितीचे निवेदन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मूळ कामे तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांना, गरोदर व स्तनदा मातांना आहार वाटप करणे शून्य ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांचे वजन व उंची घेणे अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामाचा अहवाल मोबाईल द्वारे शासनाला पाठवणे इत्यादी नित्य कामे व्यवस्थित करावी लागतात

परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृहभेटी देणे ऑक्षीमीटर वापरून प्लस तपासणी करणे तापमान तपासणे इत्यादी कामे करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी अंगणवाडी सेविकांना दिले आहेत

गृहभेटी देताना तापमान तपासणी करताना कोरणा रुग्णाशी संपर्क झाला तर कोरोणा आजार लहान बालकांमध्ये संक्रमित होईल म्हणून अंगणवाडी सेविकांना कोरणा संबंधित कामे सांगू नये व अंगणवाडीसेविकांना पोषण ट्रॅकर ॲप मधील माहिती इंग्रजी भाषेमध्ये भरण्याकरिता महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सक्ती करण्यात येत आहे परंतु सर्व अंगणवाडी शिक्षिका ही माहिती इंग्रजी भाषेमध्ये भरू शकत सर्व अंगणवाडी सेविका ही माहिती मराठी भाषा मध्ये भरावयास तयार आहेत त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप मधील माहिती इंग्रजीमध्ये भरण्याची सक्ती करू नये अशा मागणीचे निवेदन दिनांक 3 जून गुरुवार रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे देण्यात आले

यावेळी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष अनुसया वायबसे व सचिव सिंधू घोळवे या उपस्थित होत्या