• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पेट्रोल पंपावर जाऊन हेल्मेट आणि बॅट वर करून निषेध

ByND NEWS INIDIA

May 23, 2021

सुशील टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्रात सध्या कोरोणाचा हाहाकार माजला असुन सर्व व्यवसाय बंद आहे. त्यामध्येच पेट्रोलने शंभरी पार केली असून आज रविवार रोजी बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड.श्रीनिवास बेदरे यांच्यावतीने पेट्रोल पंपावर जाऊन गाडी मध्ये शंभर चे एक लिटर पेट्रोल भरून केंद्र सरकारने पेट्रोल दरवाढी मध्ये सेंचुरी केली आहे. त्याबद्दल बॅट व हेल्मेट वर करून आगळे वेगळे आंदोलन केले आहे. मोदी सरकारनं पेट्रोल दरवाढीचे डबल सेंचुरी करू नाही ही मागणी करून पेट्रोल दरवाढीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. यावेळी युवक काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष ॲड.श्रीनिवास बेदरे , शेख मोहसीन, शेख नसीर, किरण आजबकर, प्रणव भारती व इतर जन उपस्थित होते.