• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून केज येथे मिळणार कोव्हीड रुग्णांच्या रुग्णवाहिकांना मोफत इंधन

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

सध्या भारतात कोविड सारख्या महाभयंकर महामारीने थैमान घातले असून याचे महामारीने पडसाद ग्रामीण भागात जास्त दिसून येत आहेत.ग्रामीण भागातील लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी व सध्या सर्वच जण आर्थिक अडचणीत सापडला असून गरजूंना मदत म्हणून रिलायन्स कंपनीने कोविंड रुग्णांसाठी प्रत्येक खाजगी किंवा शासकीय रुग्नवाहिकाला रिलायन्स पेट्रोल पंपावरून पन्नास लिटर इंधन दररोज मोफत देण्याचे ठरविले आहे.एका रुग्नवाहिकाला दिवसात एकदाच मिळणार. प्रत्येक जण आपापल्या परीने सध्या कोविड युद्धासाठी मदत करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रिलायन्स कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्ण वाहिनी साठी येणारा अवाढव्य खर्च कमी व्हावा या हेतूने रिलायन्स पेट्रोलियम कंपनीच्या माध्यमातून अशा रुग्णवाहिका ना आता मोफत इंधन पुरवले जाणार आहे.याचा शुभारंभ केज येथे बीड रोड वर रिलायन्स पेट्रोल पंपावर यांच्या ठाकूर विजयसिंह दिख्खत हस्ते शुभारंभ झाला सध्या कोरोणाच्या गंभीर परिस्थितीतून अनेक गरजू रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज भासत असून परंतु यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनीने कोरोणा ग्रस्त रुग्णांना घेऊन जाणाऱ्या खाजगी व शासकीय रुग्णवाहिका यांना दररोज दिवसाला पन्नास लिटर फक्त याप्रमाणे मोफत इंधन देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ही योजना 30 जून 2021 पर्यंत आहे.सुरुवातीला हा उपक्रम मोठ्या शहरात राबवण्यात येत होता परंतु सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही जास्त असल्याने खरी गरज ग्रामीण भागाला आहे. मग हा उपक्रम ग्रामीण भागातही रिलायन्स कंपनीने सुरुवात केला आहे बीड जिल्ह्यात केज मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ झाला असून की जेथे या उपक्रमाचा शुभारंभ रिलायन्स पेट्रोल पंपाचे संचालक श्री विजयसिंह दिख्खत तसेच रिलायन्स पेट्रोल पंपाची मॅनेजर श्री गणेश केजकर श्री निखिल बिक्कड श्रीराम शेटे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री आठवले साहेब वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री करपे साहेब श्री एस बी थोरात सहाय्यक अधीक्षक श्रीकृष्ण नागरगोजे तंत्रज्ञ श्री डि आर तपसे लिपिक यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला