• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गेवराई उपजिल्हा रुग्णालयास तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेतर्फे 70 हजार रुपये किंमतीची औषधी भेट

ByND NEWS INIDIA

May 17, 2021

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी

गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे सोमवारी सकाळी गेवराई केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेतर्फे मेथीलप्रेडणीसोलोने इंजेक्शन.. 225 वायल 2) इनॉक्सपॅरिन सोडियम इंजेक्शन दीडशे व्हायरल 3)विटामिन सी विथ जिंक टॅबलेट 15 गोळ्याच्या 200 पाॅकेट शंभर 100मीलीचे 400 सॅनिटायझर असा एकूण 70 हजार रुपये किंमतीची औषधी बीड जिल्हा रुग्णालयाचे सीएस डॉ. गीते यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय गेवराई अधीक्षक डॉ. चिंचोळे यांच्याकडे देण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष अरुण बरकसे, अतुलजी सानप, जिल्हा केमिस्ट संघटनेचे सचिव सुरेश पवार ,जिल्हा केमिस्ट संघटनेचे कोषाध्यक्ष ईश्वर सेठ मुथा गेवराई केमिस्ट संघटनेचे तालुकाध्यक्ष जगदीश शिंदे ,सचिव गणेश मिटकर, अमोल जाधव, सुनील सोनी ,विजयकुमार दायमा, सोमनाथ शिंदे ,नारायण हावळे ,सचिन शिंदे ,विश्वनाथ रुकर व इतर जन उपस्थित होते.