• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*वंचितबहुजन आघाडी ने केलेल्या मागणीला यश*

ByND NEWS INIDIA

May 11, 2021

 

ND NEWS:

जळगांव जामोद प्रतिनिधी:-दिनांक 10 मे रोजी रात्री आठ वाजेपासून 20 मे रात्री आठ पर्यंत केलेल्या लॉक डाऊन मध्ये ऐनवेळेवर येऊन ठेपलेल्या शेतमशागती साठी ट्रॅक्टर हे वाहन महत्वाचे असताना त्यामध्ये लागणार्या डिझेल साठि शेतकऱ्यांना कोणतिहि सवलत नव्हती शेतकरि हिताचा विचार न करता प्रशासनाने पेट्रोल पंप डिझेल पंपांवर घातलेल्या बंदीमुळे शेतकऱ्यांच्या वाहनांना कामगिरी साठि डिझेल मिळाले नाही तर शेतीची मशागत कशी होईल त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडी चे माजी तालुकाध्यक्ष रतनभाऊ नाईक, देवानंद दामोदर, सुनिल बोदडे, रमेशभाऊ नाईक,पार्वताबाई इंगळे, श्रीकृष्ण गवई,सह कार्यकर्त्यांनी आज निवेदन देऊन जिल्हाधिकारी यांना शेतकर्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल लक्षात आणून दिले व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढुन शेतकर्यांना शेतमशागतीसाठि डिझेल पेट्रोल मिळेल जेणेकरून शेतकरी आपल्या शेताची नांगरणी वखरणी या लाकडांच्या काळामध्ये करेल याआदेशामुळे सर्व शेतकरी मध्ये प्रसन्नतेची लहर निर्माण झाले आहे प्रशासनाने केलेल्या आदेशाचे वंचित बहुजन आघाडी ने सुद्धा आभार मानले आहे