• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

समाज क्रांती आघाडीचे मुकुंद खैरे यांना. विदर्भ बहूजन साहित्य संघांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

ByND NEWS INIDIA

May 6, 2021

वणी:-विशाल ठोबंरे

 

आंबेडकरी चळवळीचे नेते तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक प्राध्यापक मुकुंद खैरे यांचे काल कोरोनामुळे निधन त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचा फार मोठी हानी झाली आहे

 

प्रा. मुकुंद खैरे मूळ गाव वणी जवळील चिखलगाव असून सुरवातीला त्यांनी वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयां मध्ये एल ए ची नोकरी पत्करली त्यानंतर ते संत गाडगेबाबा महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले पुढे तिथेच स्थायिक झाले. दरम्यान त्यांनी समविचारी मित्रा च्या सहकार्याने समाज क्रांती आघाडीची स्थापना केली ! आंबेडकरी चळवळीचा एक नेता म्हणून संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्र मध्ये समाज क्रांती आघाडीच्या शाखा उघडल्या ! मुकुंद जी खैरे हे स्वतः एल एल एम झालेले असून भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक म्हणुनही संपूर्ण

महाराष्ट्रात ओळख होती ! एक काळ असा होता की गाव तिथे तसेच शहर तिथे समाज क्रांती आघाडी ची शाखा असायची त्यामुळे मुंबईत झालेल्या रिपाई ऐक्य करीता एक दलित संघटनेचा नेता म्हणून मुकुंद खैरे यांना तिथे बोलण्यात आले होते. शेतकरी,कामगार,दलीत, आदिवासी यांच्या प्रश्नावर त्यांचे नेहमी विदर्भात दौरे असायचे.

विदर्भासह महाराष्ट्रात ही त्यांनी अनेक मोर्चे काढले

गेल्या आठवड्यात त्यांच्या पत्नी चे कोरोनामुळे दु:खद निधन झाले.तर तिन दिवसांपुर्वी मुलगी शताब्दी मृत्यू पावली तर प्रा.मुकुंदा खैरे सुध्द कोरोनामुळे दवाखान्यात भरती होते. काल त्यांचे सुद्धा निधन झाले. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी व मुलींचे निधन झाले आहे. हे त्यांना माहीतच नव्हते, प्राध्यापक मुकुंद खैरे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे.प्राध्यापक खैरे यांच्या निधनामुळे विदर्भातील शेतकरी, शेतमजूर,कामगार,दलीत, आदीवासी यांचा आधारवडच राहीला नाही! सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आंदोलन करुन न्याय मिळवून देणारे दादा मुकुंद खैरे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांना विदर्भ बहूजन साहित्य तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.