• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*सुप्रीम कोर्टाने दिलेला मराठा आरक्षण निकाल मराठा समाजावर अन्याय करणारा:- संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल खोडसे*

ByND NEWS INIDIA

May 6, 2021

 

*हनुमंत गव्हाणे:- केज(प्रतिनिधी)*

 

ND NEWS:- तीन दशक झाले मराठा आरक्षण मिळावं म्हणून समाजातील असंख्य तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ,आपले कुटुंब ,संसार ह्याकडे दुर्लक्ष केले व समाजासाठी आपले प्राण वेचले त्या सर्व बांधवाचे बलिदान आम्ही वाया नाही जाऊ देणार मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या चीतेची आग अजून विजली नाही आणि पुन्हा एकदा घात झाला सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलेले मराठा आरक्षण हे समाजात असंतोष निर्माण करणारा निर्णय आहे चुकिच्या पद्धतीने दिलेलं आरक्षण टिकणार नाही हे संभाजी ब्रिगेड सुरुवती पासून सांगत होते याचे गंभीर परिणाम समाजात दिसतील.आजचा निकाल हे केंद्र आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे अपयश आहे.आणि मराठा समाज हे कदापि सहन करणार नाही.सर्व राजकीय नेते,शासन व प्रशासन याना मराठ्यांच्या रोशास सामोरे जावे लागेल, आता लढाई आर या पार

मराठा समाजाला obc मध्ये आरक्षण दिले पाहिजे आणि हेच योग्य राहील,टिकाऊ व समाज उपयोगी आहे आम्ही लवकरच तीव्र आंदोलनाची दिशा ठरवू..

आता एकमेव पर्याय उरलं आहे – मराठा समाजाचं सरसकट ओ. बी. सी. मध्ये सामावेश

 

  1. गेली 28 वर्ष मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची हीच भूमिका आहे असे संभाजी ब्रिगेडचे केज तालुका अध्यक्ष राहुल खोडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.