• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे यांनी बहिणीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळुन वृद्धाश्रमाला दिला मदतीचा हात…

ByND NEWS INIDIA

May 4, 2021

हनुमंत गव्हाणे : धारूर प्रतिनिधी

आज दिनांक – ४ मे २०२१ रोजी युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे यांची बहिण कु.रुपालीचा विवाह वाकनाथपुर येथील श्री.नारायण गांडगुळे यांच्याशी लाॅकडाऊनचे पालन करुन २५ नातेवाईकांच्या उपस्थितीत अगदि साध्या पद्धतीने पार पडला.या लग्नामध्ये होणाऱ्या खर्चाचा अपव्यय टाळण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख आदरणीय रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होऊन युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे यांनी वडील तुकाराम रोडे व आई शिलाबाई रोडे यांच्याशी चर्चा करुन वृद्धाश्रमाला दहा हजार रुपयांचा किराणा घेऊन देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी वाकनाथपुर येथील बहिणीचा विवाह पार पडल्यानंतर युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे यांनी निराधार वृद्धांसाठी दहा हजार रुपयांचा किराणा,सॅनिटायजर,मास्क घेऊन कळसंबर येथील आपला वृद्धाश्रम येथे जाऊन मनिषा पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी आपला वृद्धाश्रम येथे सर्व जीवनावश्यक सामान देताना युवासेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात,युवानेतृत्व अनिकेत शिंदे,अभिजीत घुले,आदित्य अंधारे,ऋषी घुले,प्रशांत मुरकुटे,प्रविण गाढवे,सचिन सौदागर तसेच आपला वृद्धाश्रमाच्या संचालिका मनिषाताई पवार सह त्यांचे सहकारी उपस्थित होते.